राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार आहे परंतु महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे, परंतु 17 तारखेला दरम्यान आलेले शासनाच्या माध्यमातून ते तीन हजार रुपये अनेक महिलांना मिळालेले नाही त्यामुळे अनेक महिला पुन्हा अर्ज करावे लागणार का हा प्रश्न उपस्थित करत आहे कारण अर्ज मंजूर होऊन सुद्धा काही महिलांना पैशाचे वितरण झालेले नाही. त्यामुळे अशा महिलांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून अर्ज मंजूर होऊन सुद्धा महिलांना का पैसे मिळाले नाही व काय प्रक्रिया करावी लागणार आहे हे खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसल्याने अनेक महिलांना पैसे मिळालेले नाही त्यामुळे अशा महिलांना बँक खात्याशी आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे,NPCI pdf गुगल वर जावे व हा पीडीएफ मोबाईल मध्ये घेऊन त्याची प्रिंट काढावी त्यानंतर या अर्जात संपूर्ण माहिती महिलांना योग्य प्रकारे भरावी लागणार आहे विचारली गेलेली योग्य प्रकारे माहिती संपूर्ण भरून महिलांना हा अर्ज बँकेमध्ये नेऊन जमा करायचा आहे परंतु त्यासोबत काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा जोडावी लागणार आहे त्या आवश्यक कागदपत्रांमध्ये खालील प्रमाणे देण्यात आलेल्या कागदपत्रांचा समावेश आहे.
महिलांचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा पैसे न मिळण्याचे कारण म्हणजे महिलांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खात्यासोबत लिंक केलेली नाही असे करण्यासाठी वरील प्रमाणे प्रोसेस करावी लागेल त्यामध्ये NPCI अर्ज करावा लागेल त्यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रात आधार कार्ड, बँक पासबुक अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे जोडावी लागणार आहे तसेच संपूर्ण माहिती विचारली गेलेली योग्य प्रकारे भरावी. त्यानंतर बँकेमध्ये जाऊन हा अर्ज जमा करावा अशा प्रकारे अत्यंत सहजरीत्या आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक करता येईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये, लगेच अशा पद्धतीने अर्ज करा