राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, राज्यातील अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अनेक महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर होऊन सुद्धा लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे पैसे मिळालेले नाही म्हणजे शासनाच्या माध्यमातून 17 तारखेपर्यंत तीन हजार रुपयांचे रक्कम महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, तसेच अनेक महिलांना या योजनेच्या माध्यमातून पात्र असून सुद्धा रक्कम मिळालेली नसल्याने नेमका काय प्रॉब्लेम आहे हा कळालेला नाही परंतु या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाही अशा महिलांना पैसे मिळालेले नाही.
शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या खात्यावर पैशाची वितरण विविध कारणाने केले जाते अशा वेळेस शासनाच्या माध्यमातून डीबीटीच्या द्वारे नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात त्यामुळे NPCI सीडींग असणे बँक खात्याला आवश्यक आहे, त्याशिवाय बँक खात्यामध्ये पैसे शासनाच्या माध्यमातून पाठवले जाणार नाही व नागरिकांच्या खात्यावर सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे NPCI सिडिंग असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हे अर्ज कसा करायचा बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहिणीचे पैसे कसे मिळवायचे हे खालील प्रमाणे महिलांनी बघून प्रोसेस पूर्ण करावी.
NPCI साठीचा अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे, बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज मिळणार आहेत त्यावर पासपोर्ट साईज फोटो, दिलेली माहिती भरून त्यामध्ये बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, तुमचा खाते क्रमांक, खातेदार यांची सही आणि खातेदाराचे नाव असे संपूर्ण माहिती भरावी, बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्ड सोबत जोडून बँक शाखेमध्ये जमा करावे अशा पद्धतीने महिलांनाही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलगी होणार 70 लाखांची मालकीण, लगेच अशाप्रकारे गुंतवणूक करा