महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना चालू करण्यात आलेली आहे ती योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची रक्कम दिली जाते, या योजनेअंतर्गत पूर्वी घोषणा करण्यात आलेली आहे व आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया करून सुद्धा अनेक अडचणी मध्ये येत असल्याने अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, व अनेक महिला अर्ज करण्यापासून सुद्धा वंचित आहे त्यामुळे पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित घोषणा करण्यात आलेली असून 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया करण्याची मुदतवाढ दिलेली आहे.
शासनाच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली व 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली पण या तारखेपर्यंत अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती, तसेच अनेक ठिकाणी गर्दी व कागदपत्रे काढण्यासाठी गोंधळ उडालेला होता त्यामुळे शासनाने 31 ऑगस्ट ही तारीख वाढून दिलेली होती त्यामुळे अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा शासनाने घोषणा केलेली आहे, व 30 सप्टेंबर पर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे अशा प्रकारची माहिती दिली.
ज्या महिलांनी अर्ज केलेले होते अशा महिलांना 3000 रूपये 17 ऑगस्ट पर्यंत दिलेले आहे, त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज त्यानंतर केलेले असेल किंवा काही कारणाने त्यांच्या कागदपत्रांमध्ये चुकी असेल अशा महिलांना आता सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचे एकूण रुपये दिले जाणार आहे, म्हणजेच सध्याच्या स्थितीची अत्यंत महत्त्वाची बातमी असेल महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे त्यानंतर उर्वरित असलेले जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे व पुढील महिन्याचे असे एकूण मिळून महिलांच्या खात्यावर पुढील दिल्या जाणाऱ्या रकमेत पैसे दिले जाईल महिलांना एक प्रकारे योग्य आधार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदानाचे 20 हजार रुपये, कार्यवाही सुरू