महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या त्योहार च्या कालावधीत 3000 रुपयांची एकूण दोन महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, व आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागून होती व अशा स्थितीमध्ये महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी देण्यात येणार याची तारीख ठरवण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच ज्या महिला, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असतील अशांना दीड हजार रुपये येणार आहे.
देण्यात आलेल्या माहितीनुसार शासनाने 29 सप्टेंबर ही तारीख महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये तिसरा देण्याची ठरवण्यात आलेले आहे, त्यामुळे अशा पात्र महिलांना येथे 29 तारखेला त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये आलेले दिसतील, एवढेच नव्हे तर ज्या महिलांनी मागून अर्ज केलेले होते किंवा त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या या महिला अपात्र ठरलेले होत्या व आता त्या पात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांच्या खात्यावर एकूण मागील तीन हजार रुपये व आताचे दीड हजार रुपये असे एकूण रुपये मिळून 4500 रुपये एवढी रक्कम महिलांच्या खात्यात 29 तारखेला पाठवली जाईल.
राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळत असल्याने एक प्रकारे महिलांना वर्षाचा आर्थिक भार कमी होणार आहे कारण दर महिन्याला पैसे मिळाल्याने महिलांना आत्मनिर्भर होण्यास भर पडणार आहे त्याचप्रमाणे महिला मिळालेल्या पैशातून आपल्या गरजा पूर्ण करू शकणार आहेत अशा प्रकारे राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये 29 तारखेला मिळेल.
शेतकऱ्यांनो लगेच ई पीक पाहणी करा, अन्यथा नुकसान भरपाई तसेच इतर अनुदानापासून वंचित रहावे लागणार