राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली असून, योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया करणे चालू झालेली आहे, जवळपास मोठ्या संख्येने महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आलेली असून महिलांना या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. परंतु अनेक महिलांचे अर्ज करत असताना अर्ज प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका होऊन अर्ज प्रक्रिया चुकलेली होती, त्यामुळे त्यांना अर्जामध्ये काही बदल करायचे असेल तर नवीन अपडेट नुसार बदल करता येणार आहे, परंतु हा बदल फक्त एकच वेळा करता येणार आहे.
शासनाच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय मागेच काढण्यात आलेला होता, व त्यामध्ये 15 जुलै 2024 ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली होती, परंतु या तारखे मध्ये आता वाढ करण्यात आलेली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज प्रक्रिया महिलांना पुर्ण करता येणार आहे, तसेच विरोधकांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या टीका केल्या जात होत्या त्यामधील महिलांना विविध प्रकारच्या अटी व शर्ती ठरवून योजनेसाठी पात्र ठरवण्यात येत होते, परंतु आता अटी काढण्यात आलेल्या असल्याने माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ झालेली आहे व जास्तीत जास्त महिलांना आता माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करत असताना झालेल्या विविध चुका बरोबर करण्यासाठी सर्वप्रथम नारी शक्ती ॲप अपडेट करा, ओपन करून दिलीली माहिती भरून तुमचा पूर्वी टाकलेला मोबाईल क्रमांक टाका, आलेला मोबाईल वरील ओटीपी एंटर करा कॅपच्या कोड जशास तसा टाका प्रवेश करा, ओपन झाल्यानंतर एडिट बटन वर क्लिक करून त्यामध्ये तुम्हाला पूर्वी असलेली माहिती दाखवली जाईल, त्या ठिकाणी चुक झालेली असेल त्या ठिकाणी योग्य माहिती भरा तसेच योग्य डॉक्युमेंट अपलोड करून पुन्हा एकदा आपण भरलेली नवीन माहिती चेक करून सबमिट करा. अशाप्रकारे अत्यंत सहजरीत्या एडिट ऑप्शन वरून अर्ज प्रक्रिया चुकलेली बरोबर करता येणार आहे.
माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत, बारावी पास ते पदवीधरांना मिळणार 6 हजार ते 10 हजार रुपये