महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे, या योजनेच्या माध्यमातून मागील काही दिवसांमध्ये अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असून ही अर्ज प्रक्रिया अजूनही महिला पूर्ण करत आहेत आतापर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हप्ते व सप्टेंबर मध्ये तिसरा हप्ता अशाप्रकारे हप्ते वितरित करण्यात आलेले असून अजूनही काही महिलांच्या खात्यावर रक्कम वितरित होत आहेत, या योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर पाठवले जाते राज्यातील मोठ्या प्रमाणात विवाहित व एका घरातील एक अविवाहित मुलगी परियक्तत्या घटस्फोटीत महिला विधवा महिला अशा प्रकारच्या अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेता येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे व असे महिलांना एकूण साडेचार हजार रुपये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये राहिलेले दोन महिन्याचे तीन हजार व सप्टेंबर महिन्यातील दीड हजार म्हणजेच असे एकूण मिळून चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहे. परंतु अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा पैसे आलेले नसल्याची बाब समोर येत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे, हे नसल्यास महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही कारण शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून पैशाचे वितरण केले जात आहे.
महिलांच्या खात्यावर पैशाचे वितरण केले असता जेव्हा महिला बँकेतून पैसे काढण्यासाठी जातात त्यावेळी त्यांचे पैसे कापून घेतल्या जात आहे तर काही विशिष्ट कारणामुळे त्यांना पैसे मिळत नसल्याने अशा प्रकारच्या संबंधित निर्देश बँकांना देण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले पैसे कोणत्याही प्रकारात कापून घेऊ नये असे सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे बँकांच्या माध्यमातून पैसे काढून घेतले जाणार नाही व अशा प्रकारची एखादी कंप्लेंट बँके विरोधात आली तर लगेचच कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, एवढेच नाही तर महिलांनी अर्ज करून सुद्धा त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्याने अडचणी सामोरे जावे लागत आहे त्यामुळे राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर दोन सप्टेंबर ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये कार्यक्रम राबवून महिलांच्या अशा प्रकारच्या संपूर्ण प्रक्रिया आधार कार्ड बँक ला लिंक करणे या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील व महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
सरपंच व उपसरपंचाच्या पगारात वाढ आता एवढा मिळणार सरपंचाला पगार