महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या संख्येने महिला योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करत आहे, अजून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे ऑनलाइन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने महिला अर्ज करू शकणार आहे, राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी आतापर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असून नागपूर विभागात महिलांनी अर्ज प्रक्रिया केलेली असून या जिल्ह्यातील अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपण बघुयात की इतर जिल्ह्यांमध्ये व नागपूर विभागात किती महिलांनी अर्ज पूर्ण केलेले आहेत.
नागपूर जिल्ह्यामध्ये महिलांनी अर्ज केलेले आहे व त्या अर्जाची संख्या तब्बल 3 लाख 50 हजार 927 अर्ज आतापर्यंत केलेली आहे, वर्धा जिल्ह्यात 85 हजार 920 एवढे अर्ज महिलांकडून प्राप्त करण्यात आलेले आहे. भंडारा जिल्ह्यातील एक लाख 4 हजार 815 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 3 लाख 21 हजार 845 अर्ज महिलांनी केलेले आहे, चंद्रपूर मध्ये 1 लाख 68 हजार 384 अर्ज प्राप्त झालेली आहे. या सह इतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले गेलेले आहे.
31 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करण्याची तारीख देण्यात आलेली आहे, त्यापूर्वीच मोठ्या संख्येने महिला अर्ज करताना दिसते तसेच, शासनाच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर लगेच आता ऑगस्ट महिन्याच्या 19 तारखेपर्यंत साधारणतः जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे वितरित केले जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे, तसेच योजनेअंतर्गत नवीन बदल सुद्धा करण्यात आलेले आहे, त्यानुसार महिलांना योजनेसाठी पोस्टाचे खाते सुद्धा जोडले तरी चालणार आहे, यासह इतरही काही अटी शासनाच्या माध्यमातून योजनेअंतर्गत शिथिल करण्यात आलेल्या आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती जाहीर, एवढ्या पदांची भरती लगेच या ठिकाणी अर्ज करा