महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना अवलंबविण्यात आलेल्या आहे, योजनांची घोषणा करण्यात आलेली असून महिलांसाठीची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की आता महिलांसाठी तर योजना आहे परंतु आता लाडका भाऊ कुठे गेला म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबविण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झालेला होता व आता शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार माझा लाडका भाऊ योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या बरोबर लाडक्या भावाला योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शासनाच्या माध्यमातून लाडका भाऊ योजनेची अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, योजनेच्या माध्यमातून बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला 6 हजार डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्याला 8 हजार पदवीधर असणाऱ्याला 10 हजार अशाप्रकारे विद्यावेतन दिले जाणार आहे.
विद्यार्थ्याला अप्रेंटीशीप करण्यासाठी हे पैसे दिले जाणार आहे, त्यामधून विविध ठिकाणी अनुभवाच्या माध्यमातून नोकरी मिळू शकते, अशा प्रकारचा एक मुख्य उद्देश शासनाच्या माध्यमातून माझा लाडका भाऊ योजना अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे, व ही योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुलभ व अत्यंत फायदेशीर योजना आहे. अर्ज करत असताना विद्यार्थ्याला काही आवश्यक कागदपत्र सुद्धा अपलोड करावी लागणार आहे, त्यामध्ये जेवढे शिक्षण असेल त्याबद्दलचे शैक्षणिक प्रमाणपत्र अशा प्रकारे काही कागदपत्रे अपलोड करून योजना अंतर्गत लाभ विद्यार्थी घेऊ शकतो.