देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम किसान योजना राबवली जाते व महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मर्यादित पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण वार्षिक सहा हजार रुपयांचे मानधन वितरित केले जाते, व अशाच मानधनातील नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आता शेतकऱ्यांना पुढील येत्या पाच तारखेला मिळू शकणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पोहरादेवी या ठिकाणी येणार असून त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2200 कोटी 96 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पैशाची उपलब्धता असल्याने एखादा कार्यक्रम आयोजित करून लवकरात लवकर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो व यातीलच महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी 5 ऑक्टोबरला उपस्थित राहणार असून त्या ठिकाणाहून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे पाठवले जाणार आहे, त्यामुळे याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकणार आहे.
अशाप्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत दिलासा देणारी बातमी असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केल्यास पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी चा असा एकूण 4000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबरला मिळू शकते अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्ता वितरण केले जाणार व यासाठी लागणारा निधी मंजूर करून वितरणास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.
कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान