अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती, 500 कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना दिला जाणार रोजगार | Nirmala Sitaraman 

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी बजेट सादर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर तो पहिला बजेट होता, त्यामध्ये तरुणांबद्दल त्यांच्या रोजगाराबद्दल सांगण्यात आले म्हणजे अनेक जण म्हणतात की तरुणांना रोजगार नाही परंतु आमच्या माध्यमातून आता पाचशे कंपन्यांमध्ये तब्बल एक कोटी तरुणांना रोजगार दिला जाणार आहे, म्हणजेच इंटर्नशिप दिली जाणार आहे.

 

जवळपास 500 कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल दिली जाईल म्हणजेच इंटर्नशिप नंतर तरुणांना प्रमाणपत्र मिळेल त्या भरोशावर कोणताही नागरिक बेरोजगार राहू शकणार नाही इतर ठिकाणी सुद्धा या प्रमाणपत्राचा उपयोग करून तरुणाला रोजगार म्हणजेच नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकणार आहे, अशा प्रकारची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दरम्यान दिलेली आहे.

 

500 कंपन्यांमध्ये जवळपास एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देणे म्हणजेच एका कंपनीमध्ये जवळपास 4000 तरुणांना इंटर्नशिप द्यावी लागेल, महिन्याला पाच हजार रुपये देऊन तरुणांना जवळपास एक वर्ष इंटर्नशिप द्यावी लागेल, म्हणजेच बारा महिन्यानंतर तरुणांना टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल, व त्याच प्रमाणपत्राच्या भरोशावर एका वर्षानंतर इतर ठिकाणी सुद्धा चांगली नोकरी मिळण्यास त्या प्रमाणपत्रावरून उपयोग होईल.

 

यावरूनच विरोधकांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले होते व त्यालाच उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे की आम्ही तरुणांना विविध कौशल्यांनी प्रगत करण्याच्या उद्देशाने काम करीत आहोत, यामुळे तरुणांमध्ये कौशल्य विकसित होईल विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास संधी मिळेल व त्यांना प्रमाणपत्रावरूनच इतरत्र ठिकाणी चांगल्या नोकरी सुद्धा मिळू शकतील.

 

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही, बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लाभ 

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts