शेती करत असताना विविध प्रकारचे अडचणीला सामोरे शेतकऱ्यांना जावे लागते अशा स्थितीमध्ये शेतकरी दरवर्षी पिक विमा योजनेमध्ये सहभागी होतात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते व अशाच नुकसान भरपाईच्या नियमांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे, मोठ्या प्रमाणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नुकसान भरपाई ची नोंदणी करतात अशा स्थितीमध्ये पूर्वी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले जात होते व त्यानंतर पिकांच्या स्थितीनुसार म्हणजेच वाढीच्या स्थितीनुसार पैशाचे वितरण केले जात होते व यातच आता बदल करण्यात आलेला आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता पूर्वीच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे पूर्वी मात्र पीक कोणत्या अवस्थेमध्ये आहे वाढीच्या कोणत्या अवस्थेत आहे किती वाढ झालेली आहे त्यानुसार पिकासाठी नुकसान भरपाई दिली जात होती परंतु आता मात्र शंभर टक्के जर पिकाची नुकसान झालेले असेल तर पिकाचा कालावधी बघितला जाणार नाही तर सरळ सरळ शेतकऱ्यांना शंभर टक्के एवढी नुकसान भरपाई दिली जाईल, दिलेल्या मंडळातील नुकसान 25% पेक्षा जास्त झालेले असेल तर एकूण नुकसान भरपाई पैकी 25% एवढे नुकसान भरपाई दिली जाईल.
व उर्वरित असलेली 75 टक्के एवढी रक्कम पिक कापणी अहवाला नंतर दिली जाईल, परंतु यामुळे मात्र शेतकऱ्यांना फक्त अगदी 25% एवढीच नुकसान भरपाई मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या शासनाच्या नवीन नियमाला लागू करू नये किंवा पूर्वीचे नियम लागू असावे अशा प्रकारची मागणी केली जात आहे व अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून नुकसान भरपाई देण्याबाबतचा हा एक मोठा नियम शासनाने दिलेला आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये, लगेच अशा पद्धतीने अर्ज करा