राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे, या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होत चाललेले आहे, परंतु शेती पिकांचे नुकसान होत असताना शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीही उरलेले नाही कारण अति पावसामुळे पाण्याखाली पिके बुडालेली आहे, तर काही पिके खडून गेलेली आहे अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे, कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतीवर खर्च केलेला आहे व पावसामुळे तो केलेला खर्च धुळीस मिळताना दिसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच आपल्या शेती पिकाचे नुकसान झालेले असल्यास तक्रार नोंदवायची आहे.
अनेक शेतकरी दरवर्षी पिक विमा योजनेअंतर्गत लाभ नोंदवतात, आताही खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना जर पुढे नुकसान भरपाई किंवा पिक विमा मिळवण्यासाठी तक्रार नोंदवणे किंवा आपल्या पिकांचे झालेले नुकसान दाखवणे गरजेचे आहे यासाठी टोल फ्री क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यावरून अत्यंत सहजरित्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदवून आपल्या पिकांची स्थिती कळवता येणार आहे.
शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन अधिकारी पिकांची पाहणी करतील पिकांची झालेले नुकसान नोंदवतील अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली स्थिती नोंदवली जाईल, यासाठी तक्रार करणे आवश्यक आहे, क्रॉप इन्शुरन्सच्या संकेतस्थळावर सुद्धा तक्रार नोंदवता येणार असून 14447 या टोल फ्री क्रमांकावरून सुद्धा तक्रार शेतकऱ्यांना नोंदवता येणार आहे.