महाराष्ट्र राज्यांमध्ये ओबीसी साठी विविध प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जातात या कर्ज योजना इतर मागासवर्गीय व वित्त महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात, व याच योजनांची अर्ज प्रक्रिया करणे चालू झालेले आहे, अर्थातच या ओबीसी कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभ घेता येणार आहे, त्यामध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच लाभार्थ्यांची नेमके पात्रता निकष काय आहे? अशा प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न खालील पद्धतीने करूयात व या संपूर्ण अटींमध्ये जर लाभार्थी पात्र ठरत असेल, तर त्याला अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ओबीसी कर्ज योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त इतर मागासवर्गीयातील लाभार्थ्यांनी अर्ज करून लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन सुद्धा महामंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे, एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज , 20 टक्के बीज भांडवल कर्ज , वैयक्तिक कर्ज व्याज परतावा , गट कर्ज व्याज परतावा , शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी उद्दिष्ट प्राप्त झालेल्या असून कर्ज परताव्याचा कालावधी हा 48 महिन्यांचा असणार आहे, या महिन्यांमध्ये नियमित कर्ज परतफेड केल्यास व्याज द्यावे लागणार नाही.
आवश्यक पात्रता अटींमध्ये अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, लाभार्थी इतर मागासवर्गीय असणे गरजेचे आहे, वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे एवढी देण्यात आलेली आहे, अर्जदार व्यक्तींनी निवडलेल्या व्यवसायाबद्दल त्याला ज्ञान असणे गरजेचे आहे, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असू नये कमी असावे, कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे, अशा प्रकारे हे पात्रता निकष योजनेच्या माध्यमातून आहे.
आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँकेची पासबुक पासपोर्ट साईज फोटो महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, यासह इतरही काही आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे तसेच http://www.msobcfdc.org/default या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याची निवड करून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.