सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण भागांमध्ये कापूसाचे पीक हे मोठ्या प्रमाणात पाते अवस्थेमध्ये आहे, तर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळीच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे अनेक पिकांना बोंडे गळत असून कापसाचे पीक अशा स्थितीमध्ये पातेगळ होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर नियंत्रण करणे आवश्यक आहे कारण प्रत्येक पातीपासून प्रत्येक कापसाचे बोंड बनत असल्याने जर पाते गळ आले तर बोंड बनणारच नाही त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा तोटा पातेगळीमुळे होणार आहे, अशा स्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेवर कापसाच्या पिकावर लक्ष ठेवून पातेगळीवर नियंत्रण मिळवणे फायदेशीर ठरेल.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, कारण कापसाच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंत अतोनात शेतकरी खर्च करतात अर्थातच शेताला डवरनी खुरपणी यासह फवारण्या अशा पद्धतीने विविध प्रकारच्या सोयी सुविधांमध्ये कापूस पिकावर अतोनात खर्च केला जातो परंतु एकदा काळ जर वातावरण बिघडले म्हणजेच जर अति पाऊस झाला किंवा पावसाचा खंड पडला अशा स्थितीमध्ये दोन्हीकडून सुद्धा पातेगळ ही कापूस पिकाची होत असते पावसाचा खंड पडल्याने पिकाची पातळीवर मोठ्या प्रमाणात होते तसेच यासह अनेक अशी कारणे आहेत जी पातेगळीसाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे अशी मोठी प्रमाणात होणारी पातळीवर शेतकऱ्यांनी थांबवणे गरजेचे आहे.
शेतीमध्ये जर शेतकऱ्यांच्या झाडाच्या खाली पाते गळून दिसत असतील किंवा शेतकऱ्याला त्याचा अंदाज आलेला असेल तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सर्वप्रथम फवारणी करायला हवी,नॅफ्थाइल ऍसिटिक ऍसिड (NAA) 20 पीपीएम याची फवारणी करावी तसेच शेतकऱ्यांनी कापसाचे शेंडे खुडावे अन्यथा कापसाच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांची फवारणी सुद्धा करावी यामुळे कापसाची वाढ रोखून कापूस पिकाला एवढी पाते आहे, त्या सर्वांचे रूपांतर लवकरात लवकर बोंडाच्या रूपामध्ये होते, त्यामुळे शेतकऱ्यांना पातेगळीला सामोरे जास्त जावे लागत नाही.पोटॅशियम नायट्रेटची 1 टक्के याची फवारणी सुद्धा करता येऊ शकते तसेच झाडांमध्ये हवा खेळती रहावी यासाठी दरवर्षी लागवड करतानाच शेतकऱ्यांनी योग्य नियंत्रण व नियोजन करावे.