राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने एकसारखी हजेरी लावलेली आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतो, तर राज्यातील काही भागांमध्ये पावसाने सरासरी ओलांडण्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली असून, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त सरासरी ओलांडलेली आहे हे सुद्धा बघणे आवश्यक ठरणार आहे, तसेच हवामान विभागाने पुढे पावसाचा अंदाज कसा असणार म्हणजेच कोणत्या भागात पाऊस पडणार ही माहिती देण्यात आलेली असून, राज्यातील पावसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूया.
राज्यातील येणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये सुद्धा चांगली वाढ झाल्याचे दिसत आहे, राज्यातील कोकण, विदर्भ अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे, तसेच राज्यातील गोंदिया, पालघर, भंडारा या ठिकाणी सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत जेवढा पाऊस झालेला आहे, त्या सर्व पावसापेक्षा सर्वाधिक पाऊस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे, कारण या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने सरासरी ओलांडलेली आहे.
राज्यातील 192 टक्के पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे, या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेला आहे, अशा वेळेस मागील वर्षी कमी पावसाची नोंद झालेली होती परंतु सोलापूर मध्ये यावर्षी मात्र चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे. तसेच अनेक ठिकाणी धरणांमध्ये पाणी साठवणूक केली जात असून अनेक धरणे धोक्याच्या पातळीवर सुद्धा आलेली आहे.
हवामान विभागाने गेल्या दोन दिवसापूर्वी माहिती दिलेली होती, व त्यानुसार बंगालच्या उपसागरामध्ये पावसने पोषक स्थिती निर्माण झालेली होती, व याच पोषक स्थितीचा परिणाम आता राज्यातील येणाऱ्या पावसावरून दिसत आहे, राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार ते काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.
माझा लाडका भाऊ योजनेचा अर्ज करताना ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार