राज्यामध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे अर्थातच राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे, काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली असून अनेक भागांमध्ये येत्या काही तासात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशा प्रकारची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये येल्लो अलर्ट जाहीर केलेला आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केलेली असून यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर अतीवृष्टी झाल्यासारखा पाऊस आलेला होता यामुळे अनेक नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलेले होते नदी नाले ओसंडून वाहू लागलेले होते, व आता जोरदार पावसाची शक्यता राज्यात वर्तवलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेऊन रहावे, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असून येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.
जालना, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात मध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून राज्यातील सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, बुलढाणा, अमरावती, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अकोला या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, तसेच 13 व 14 सप्टेंबर पर्यंत हा पावसाच्या अंदाज असून विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो.
शेतकऱ्यांना मिळणार सरसकट नुकसान भरपाई, शेतीचे पंचनामे होणार नाहीत