देशातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे व विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसने चालू झालेले आहे यालाच मुख्य कारण म्हणजेच भारताच्या आजूबाजूला दोन्ही बाजूने पावसाला पोषक असलेले हवामान निर्माण झालेले आहे, त्यामुळे विविध भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे भारतातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच कोणत्या भागात मोठ्या पाऊस पडणार याप्रकारे संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अरबी समुद्रामध्ये असना चक्रीवादळ निर्माण झाल्याने याचा परिणाम जरी भारतावर प्रत्यक्ष पडत नसला तरी सुद्धा पावसाची शक्यता ही भारतात जास्त असणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झालेल्या पावसाचे पोषक हवामान निर्माण होऊन पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तसेच मागील काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये विविध ठिकाणी पाऊस पडताना दिसतो परंतु येणाऱ्या या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जास्त पाऊस बघायला मिळू शकते.
चक्रीवादळाचा परिणाम म्हणून भारतातील अनेक भागांमध्ये अतीवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून वर्तवली गेली आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेश छत्तीसगड, मध्यप्रदेश गोवा गुजरात कर्नाटक केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश तेलंगणा तमिळनाडू दिल्ली हरियाणा पंजाब चंदिगड जम्मू काश्मीर राजस्थान अशा सर्व भागांमध्ये नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच कोणत्या भागात मोठ्या पाऊस पडणारची शक्यता हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केलेली आहे त्यामुळे अशा भागातील सर्वांनी सतर्कतेचा इशारा बाळगून काळजी घेणे आवश्यक आहे.