देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करतात व राज्यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवताना दिसत आहे, कारण फक्त एक रुपया भरून एका पिकाचा पिक विमा भरणे शक्य झालेले आहे, पूर्वी मात्र शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मोठी रक्कम भरावी लागत होती, परंतु आता फक्त एक रुपया देऊन पिक विमा भरला जात आहे, तसेच दिवसेंदिवस पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचा संख्येमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते.
15 जुलै 2024 ही खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा भरण्याची शेवटची तारीख शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती, परंतु अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काही कारणास्तव भरलेला नसल्याने त्यांच्यासाठी एक प्रकारे मुदतवाढ देण्यात आलेली असून, शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पिक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. त्यासह पिक विमा भरल्याने शेती पिकाला संरक्षण मिळणार असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने पीक विमा भरत आहेत.
पिक विम्याची तारीख वाढवल्यानंतर सुद्धा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, तसेच 31 जुलै 2024 ही शेवटची तारीख असल्याने या तारखेपर्यंत अजूनही अनेक शेतकरी पिक विमा योजनेमध्ये नोंदणी करण्याची शक्यता आहे, व मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे, व त्यांच्या पिकाला एक प्रकारचे पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील तब्बल आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला असून सातारा जिल्ह्यातील 2 लाख 84 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे, तसेच उर्वरित जे शेतकरी आहेत, त्यांना 31 जुलै पर्यंत पिक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे, कारण दरवर्षी येणाऱ्या दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी नुकसान यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला धोका निर्माण होतो, अशा स्थितीमध्ये शेती पिकाला संरक्षण मिळवण्यासाठी पिक विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत, बारावी पास ते पदवीधरांना मिळणार 6 हजार ते 10 हजार रुपये