खरीप हंगाम 2023 मध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा 25 टक्के एवढा देण्यात आलेला होता परंतु शेतकऱ्यांच्या असलेल्या मागणीमुळे उर्वरित असलेला पिक विमा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती, व शासनाच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात आलेली आहे, परंतु यामध्ये अनेक शेतकरी अपात्र सुद्धा ठरलेले आहे त्यामुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला गेलेला नाही.
ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला होता व त्यांचे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विम्याची रक्कम वितरित करण्यात आलेली होती, व ही रक्कम शेतकऱ्यांसाठी ची 330.77 कोटी रुपये एवढी ही रक्कम देण्यात आलेली आहे, मे व जून महिन्यामध्ये दुसरा टप्पा वितरित करण्यात आलेला होता व अंतिम पिक कापणी अहवाला नंतर आता गेल्या आठवड्यामध्ये 40.09 कोटी रुपये एवढी रक्कम जा वितरित करण्यात आलेली आहे, ही रक्कम 36 हजार 495 एवढ्या शेतकऱ्यांसाठी इथे एक करण्यात आलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास आणि शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु संभाजीनगर जिल्ह्यातील 73 हजार शेतकरी पिक विमा पासून अपात्र ठरलेले आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे व अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला असून काही शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित सुद्धा राहिलेले आहे.