पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये एवढी रक्कम देणारी पी एम किसान योजना चालू करण्यात आलेली असून, या योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांचा लाभ देण्यात आलेला आहे, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये एवढे मानधन शेतकऱ्याला दिले जाते रुपये हे एकूण तीन हप्त्यांमध्ये दिले जाऊन प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्ते वितरित झालेले असून अठरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे.
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकरी पात्र आहेत या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे त्यांची ई केवायसी पूर्ण केलेली आहे तसेच बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जातो अनेक शेतकरी या बाबी पूर्ण न केल्यामुळे अपात्र ठरवून योजनेपासून वंचित राहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळवायचा असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यावे अशी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांच्या या प्रक्रिया पूर्ण असतील अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.
प्रत्येक हप्ता चार महिन्याच्या कालावधीनंतर वितरित केला जातो त्यामुळे पुढील हप्ता कधी वितरित केला जाणार?एक प्रकारे शक्यता वर्तवली जात आहे व त्यानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळू शकतो म्हणजेच पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी मिळणार आहे, जेव्हा हप्ता वितरित केला जाईल त्यापूर्वी शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल व डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये पाठवले जाईल.
महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार वाढणार