देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना राबवली जाते, या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 17 हत्यांचा लाभ शेतकऱ्यांना दिला गेलेला आहे, देशातील मोठ्या संख्येने शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकरी पात्र असून सुद्धा काही कारणाने त्यांना हप्ता मिळत नाही आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुढील अठरावा हप्ता मिळावा यासाठी काही आवश्यक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे, त्यामुळे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार तसेच कोणत्या नागरिकांना हा हप्ता मिळणार नाही अशा प्रकारे संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरतात त्यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खात्याची संलग्न करून घेणे ही बाब अत्यंत महत्त्वाची असून पूर्ण करणे आवश्यक आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी केवायसी करावी ही केवायसी न केल्यास शेतकऱ्याला पीएम किसान योजनेच्या अटीमध्ये पात्र असून सुद्धा लाभ दिला जाणारा नाही त्यामुळे pmkisan.gov.in या ठिकाणी जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण शेतकऱ्याला अगदी सहजरीत्या करता येणार आहे, एवढे करता न आल्यास जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन शुल्क देऊन सुद्धा ई केवायसी शेतकऱ्याला पूर्ण करता येणार आहे.
तसेच सतरावा हप्ता मिळाल्यानंतर अठराव्या हफ्त्यांची वाढ शेतकरी बघत आहे त्यामुळे अठरावा हप्ता शक्यतो ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळू शकतो, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात असून हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार तर मिळण्यापूर्वी शासनाच्या माध्यमातून तारीख व वेळ ठरवली जाईल, सर्वसामान्यांना याची माहिती पूर्वीच दिली जाईल त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कार्यक्रम ठरवून पैशाचे वितरण प्रत्येक पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये एवढ्या रकमेमध्ये केले जाईल.
शेतकऱ्यांनो ई पिक पाहणी न केल्यास शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागणार