देशामध्ये पी एम किसान योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये एवढे मानधन वितरित केल्या जाते, आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने लाखो शेतकरी पात्र ठरलेले आहेत व या लाखोच्या संख्येने पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये वितरित केली जातात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 17 हप्त्यांची वितरण केले गेलेले असून शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा लागलेली होती व अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 5 ऑक्टोंबर ला पी एम किसान यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये देशातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता डीबीटी च्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत अर्ज केलेला होता किंवा जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना ई केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, ही केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक शेतकरी पात्र आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा हप्त्यांचा लाभ मिळत नाही याची मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया व आधार संलग्न आपल्या बँक खात्याशी केलेले नाही हे एक मुख्य कारण आहे अशा प्रकारच्या प्रक्रिया शेतकऱ्यांनी लगेच पूर्ण करून घ्याव्या व येत्या पाच ऑक्टोंबर चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल त्यामुळे अशाप्रकारे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोंबर या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे.
कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान