शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यातच महिलांना एक प्रकारची गुंतवणूक करून आर्थिक सहाय्यक मोठ्या प्रमाणात प्राप्त व्हावे याकरिता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक प्रकारची उत्तम योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून जर महिलांनी दोन वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर महिलांना दोन वर्षांनंतर भन्नाट असा व्याजदर मिळणार आहे. महिलांसाठी असलेली पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना या योजनेबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
पोस्ट ऑफिसची असणारी महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना अंतर्गत महिलाना एक हजार रुपयांमध्ये आपले खाते योजनेच्या माध्यमातून उघडता येणार आहे, त्यानंतर महिलेला दोन वर्षाच्या कालावधीसाठी त्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल, गुंतवणूक ही दोन वर्षासाठीची असून त्यामध्ये जर महिलेने 2 लाख रुपये गुंतवले असता, त्याचा व्याजदर दोन वर्षानंतर महिलेला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, योजनेअंतर्गत दोन लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक करण्याची मर्यादा देण्यात आलेली आहे.
2 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर 7.5 टक्के एवढा व्याजदर महिलेला योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये गुंतवले असल्यास दोन वर्षानंतर गुंतवलेली रक्कम व त्यावर मिळालेल्या व्याजासह महिलेला उपलब्ध होणारी एकूण रक्कम 2,32,044 रुपये एवढी असेल. अशाप्रकारे महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाणारी महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे.
महिलांना मिळणार उद्योगिनी योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासह 30 टक्के अनुदान, लगेच अर्ज करा