महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणी मध्ये आणल्या जातात व अशाच प्रकारचेच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांना थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात परतावा मिळवता येऊ शकतो, परंतु अशा योजनांची माहिती अनेक महिलांकडे नसते अशामुळे अनेक महिला योजनेच्या लाभांपासून वंचित राहतात संपूर्ण योजनांची माहिती मिळणे गरजेचे आहे महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अशा प्रकारची एक भन्नाट योजना चालू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेत आहे या योजनेचे नाव म्हणजेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना होय.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत फक्त महिलाच लाभ घेऊ शकणार आहे, महिलांना अत्यंत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त व्याज परतावा या महिला बचत प्रमाणपत्र योजनेच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतो यामुळे या योजने अंतर्गत जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेतल्यास चांगला फायदा होईल या योजनेअंतर्गत असलेला व्याज दर 7.5% एवढा आहे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत महिलांना कमीत कमी एक हजारापासून ते जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतचे गुंतवणूक करता येणार आहे, समजून सांगण्यासाठी उदाहरण घ्यायचे झाल्यास जर एका महिलेने गुंतवणूक 1 लाख 90 हजारांची केली असेल, तर महिलेला ही गुंतवणूक दोन वर्षासाठी ठेवावी लागेल, दोन वर्ष गुंतवणूक ठेवल्यानंतर 30442 रुपये एवढे व्याज मिळणार आहे, व हे व्याज 7.5% दराने असेल.
म्हणजेच महिलेने जर एक लाख 90 हजार रुपये एवढी गुंतवणूक दोन वर्षासाठी केली असेल तर त्या महिलेला 30442 रुपये एवढे व्याजाचे पैसे मिळेल, एकूण रक्कम 2,20,442 रुपये एवढी एकूण रक्कम महिलेला शेवटी मिळणार आहे, अर्थातच मोठ्या प्रमाणात व्याज परतावा महिलेला मिळेल अशा प्रकारची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.