आपल्या भारत देशामध्ये रेशन कार्ड धारक नागरिकांना धान्याचा पुरवठा अत्यंत स्वस्त दरामध्ये केला जातो तर मागील काही दिवसांमध्ये म्हणजेच कोरोनाच्या काळामध्ये अनेक रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा सुद्धा करण्यात आलेला होता अशा स्थितीमध्ये देशातील जे रेशन कार्ड साठी पात्र नागरिक आहे अशांनी रेशन कार्ड काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे पूर्वी रेशन कार्ड काढण्याची प्रक्रिया अवघड होती म्हणजेच विविध ठिकाणी जाऊन रेशन कार्ड काढून घ्यावे लागत होते, परंतु आता ज्या नागरिकांना रेशन कार्ड काढायचे असेल अशा नागरिकांना कोणत्याही ठिकाणी न जाता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून सुद्धा रेशन कार्ड काढता येणार आहे.
रेशन कार्ड कशा पद्धतीने काढायची तसेच ते करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, रेशन कार्ड धारकांना आता मोफत धान्य दिले जाते त्यामुळे अशा मोफत धानण्याचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो तो कशा पद्धतीने करायचा त्यासाठी सर्वप्रथम http://rcms.mahafood.gov.in/ लिंक ओपन करून घ्यावी. पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत.
त्यानंतर साइन इन करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल विचारली गेलेली माहिती मोबाईल क्रमांक ओटीपी अशा पद्धतीने प्रोसेस करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर नागरिकांना सर्वप्रथम, पब्लिक लॉग ऑप्शन निवडा, न्यू यूजर साइन अप यावर जाऊन, त्या ठिकाणी तुम्हाला नवीन रेशन कार्ड अर्ज भरावा लागणार आहेत, त्यामुळे नवीन रेशन कार्ड अर्जावर गेल्यानंतर विचारले गेलेली संपूर्ण प्रकारची माहिती रेशन कार्ड करणाऱ्या नागरिकाला भरावी लागणार आहे, मोबाईल क्रमांक वगैरे संपूर्ण माहिती भरून घ्यावी. अशा पद्धतीने अर्ज सबमिट करावा.