रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण, काही रेशन कार्डधारक नागरिकांचे एक ऑक्टोंबर पासून रेशन देणे बंद होणार आहे, तसेच ज्या नागरिकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, अशा नागरिकांची नवे रेशन कार्ड मधून काढून टाकले जाणार आहे, त्यामुळे रोशन कार्ड धारक नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट असून या अपडेट नुसार लवकरात लवकर जवळच्या रेशन धान्य दुकानांमध्ये जाऊन नागरिकांनी कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींची नवे रेशन कार्डावर नोंदवलेले असतील अशा सर्व व्यक्तींची ई-केवा यसी करून घ्यावी.
रेशन धान्य दुकानदार ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत त्यामुळे तुमच्या रेशनवर किती नागरिकांची नोंद आहे व अशा संपूर्ण नोंदीत असलेल्या रेशन कार्ड धारकांना आपल्या आधार कार्ड सह रेशन धान्य दुकानात जाऊन आपल्या बोटाचा थंब देऊन ये केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या जवळच्या रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करा केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, रेशन कार्ड धारक नागरिकांना गरजेचे असून ही प्रक्रिया 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार आहे त्यानंतर ऑक्टोबरच्या एक तारखेपासून ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल अशांची नावे रेशन कार्डातून काढून टाकली जाईल.
अनेक नागरिकांना प्रश्न पडलेलाच असेल की शासनाच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक का करण्यात आलेली आहे? कारण अनेक नागरिकांनी गैरप्रकारे रेशन कार्ड वर नाव नोंदवलेले आहेत अथवा जे नागरिक मृत पावलेले आहे अशा नागरिकांचे नाव रेशनकार्डातून न काढता त्यांच्या नावावर धान्य घेणे चालू आहे, अशा विविध प्रकारच्या घोटाळ्यांना सामोरे आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, त्यामुळे ज्यांची केवायसी होणार नाही अशांची नावे सुद्धा रेशन कार्डावरून काढून टाकली जाईल.
सप्टेंबरच्या या तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासात सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज