विविध प्रकारच्या उद्योग करणाऱ्या सर्वसामान्य व्यावसायिकांचे हित साधले जावे याकरिता राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवला जातात, या योजनेचा लाभ चर्मकार समाजातील नागरिकांना घेता येणार आहे, त्यामुळेच अशा प्रकारच्या विविध योजनांसाठीची अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून, ज्यांना लाभ घ्यायचा असेल अशांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
चर्मकार समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेच्या माध्यमातून अर्ज करावे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात आवाहन केले जात आहे. 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदती कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण, उत्कर्ष ऋण योजना अशा प्रकारच्या विविध योजना राबवल्या जात असल्याने मोठ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
लाभ घेत असताना काही आवश्यक कागदपत्रांची गरज अर्जदाराला हवी असणार आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, स्टॅम्प पेपर वर विहित नमुन्यातील शपथपत्र, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र यासह इतरही काही आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडे विविध योजनांचा लाभ घेत असताना म्हणजे अर्ज करताना उपलब्ध असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी संपूर्ण वर दिलेल्या प्रमाणे कागदपत्रे उपलब्ध करून घ्यावी त्यानंतर अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी व मुंबई उपनगर गव्हर्नमेंट लेदर वर्किग स्कूल कंपाऊड, खेरवाडी, वांद्र (पूर्व) मुंबई- 400051 या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून अर्ज जमा करावा यानंतर अर्जदाराची योग्य प्रकारे निवड केली जाईल व योजनेचा लाभ दिला जाईल.
महिलांसाठी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना, एवढी गुंतवणूक केल्यास मिळणार मोठा व्याजदर, लगेच गुंतवणूक करा