ग्रामीण भागामध्ये ग्राम रोजगार सेवक हा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिल्या जाते, परंतु असे असताना सुद्धा आतापर्यंत ग्राम रोजगार सेवकाच्या मानधनाचा विचार करायचा झाल्यास म्हणजेच पगारीचा विचार करायचा झाल्यास रोजगार सेवकाची पगारही अत्यंत कमी होती व त्यामुळे राजगार सेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पगारवाढीची मागणी केली जात होती व अशा स्थितीमध्ये आता शासनाच्या माध्यमातून जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे व त्यानुसार ग्रामरोजगार सेवकांच्या पगारीमध्ये वाढ केलेली आहे.
रोजगार सेवकाला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामानुसार पगार दिली जात असते परंतु हा पगार अत्यंत कमी असल्याने तसेच अनेक गावांमध्ये काम कमी असल्याने त्यानुसार पगारही अत्यल्प दिला जातो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वाढीव मांनधणानुसार आठ हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. तसेच त्यामध्ये ज्या रोजगार सेवकांनी दहा हजार पेक्षा जास्त मनुष्य दिवस निर्माण केलेली आहे अशा रोजगार सेवकाला मजुरी खर्चाच्या दोन टक्के एवढे मानधन दिले जाईल.
दोन हजार दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या रोजगार सेवकाला एक हजार रुपये व 2001 पेक्षा जास्त मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या रोजगार सेवकाला प्रतिमहा दोन हजार रुपये, प्रवास भत्ता दिला जाईल. तसेच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एक ऑक्टोंबर पासून अशा प्रकारचे वाढीव मानधन दिले जाईल. अशाप्रकारे ग्रामीण रोजगार सेवकांच्या पगारीत वाढ झाल्याने ग्रामरोजगार सेवकाला एक प्रकारे दिलासा मिळनार आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना दिलासा, लाडकी बहीण योजनेबाबत शासनाचा निर्णय