सरपंच व उपसरपंचाच्या पगारीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशा प्रकारची महत्त्वाची बातमी प्रत्येक गावातील सरपंच व उपसरपंचासाठी महत्त्वाची असून, राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरपंच व उपसरपंच यांच्या पगारीत वाढ करण्याबाबतचा हा निर्णय जाहीर करण्यात आलेला असून आता सरपंचाला नेमका किती पगार मिळणार? कोणत्या गावातील किती लोकसंख्या आहे व त्या लोकसंख्येनुसार पगार उपसरपंच व सरपंच यांना किती मिळणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
पूर्वी मोठ्या प्रमाणात सरपंच व उपसरपंच यांच्या माध्यमातून मागणी केली जात होती की पगारांमध्ये वाढ करण्यात यावी कारण सरपंचाला उपसरपंचाला अत्यंत कमी पगार मिळत असल्याने या मागणीला आता एक वळण मिळालेले असून याचाच फायदा आता पगार वाढीमुळे प्रत्येक गावातील सरपंचाला तसेच उपसरपंचाला होणार आहे. प्रत्येक गावासाठी महत्त्वाचे असे पद आहे, कारण संपूर्ण गावाचा कारभार तसेच संपूर्ण प्रकारची कामे सरपंचाला पार पाडावी लागता, त्या पाठोपाठच उपसरपंचाचेही चांगलेच काम असते त्यामुळे अशांना आता पगारवाढ दिलेली आहे.
तुम्हाला तर माहीतच असेल की सरपंच व उपसरपंच यांचा पगार हा गावातील जेवढी लोकसंख्या जास्त तेवढा पगार जास्त अशा प्रकारे असतो त्यामुळे आता ज्या गावांमध्ये 0 ते 2000 अशी लोकसंख्या असेल अशा गावातील सरपंचाला 6000 रुपये एवढा पगार मिळेल तसेच, उपसरपंचाला 2000 रुपये पगार मिळणार आहे. ज्या गावांमध्ये 2000 ते 8000 अशी लोकसंख्या आहे अशा गावातील सरपंचाला आठ हजार एवढा पगार मिळतो व उपसरपंचाला तीन हजार एवढा पगार मिळतो, ज्या गावांमध्ये 8000 हून जास्त लोकसंख्या असेल अशा गावातील सरपंचाला 10 हजार रुपये एवढा पगार मिळेल, व उपसरपंचाला चार हजार रुपये एवढा पगार मिळेल अशा प्रकारे आता सरपंच व उपसरपंच अशा दोघांच्याही पगारात वाढ करण्यात आलेली आहे.