राज्य शासनाच्या माध्यमातून सौर कृषी पंप योजना राबवली जाते, शासनाच्या माध्यमातून आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना चालू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आता सौर कृषी पंप दिले जाईल त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा पाण्याची सुविधा होऊ शकणार आहे, या मध्ये विजेची बचत शेतकऱ्यांची होणारा आहे व वीज नसताना सुद्धा दिवसा पाण्याची उपलब्धता होईल.
शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या पॅनल सह एकूण रकमेच्या दहा टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे उर्वरित असलेली रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही, ज्या शेतकऱ्याकडे कमी जमीन आहे त्यानुसार कमी एचपीचे पंप ज्या शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्याला साडेसात एचपी चे पंप दिले जाईल. त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर एकूण रकमेच्या फक्त आणि फक्त पाच टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विजेची उपलब्धता नसेल अशा शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची एक मोठी साथ मिळणार आहे, त्यामुळे सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना बिना विजेचे सुद्धा दिवसा शेतीला पाणी देता येईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, काही आवश्यक कागदपत्रे लागणार असून त्यामध्ये आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, जमिनीचा सातबारा उतारा अशा प्रकारची काही कागदपत्रे त्यासह काही किरकोळ कागदपत्रे सुद्धा लागणार आहेत.https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php ओपन करून विचारली गेलेली माहिती भरून अर्ज प्रक्रिया ओपन करावी त्यानंतर शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप निवडून किती एचपी चा हवा आहे किती जमीन आहे विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरावी. अर्ज सबमिट करावा.