खरीपा हंगाम 2023 मध्ये कापूस सोयाबीन पीकाची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती परंतु पावसाची आवश्यकता असताना पावसाचा खंड पडला व अशा शेतीमध्ये हा खंड 20 ते 21 दिवसापेक्षा जास्त काळाचा होता व त्यामुळे असा मोठ्या पावसाचा खंड मुळे कापूस अशा प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना एक प्रकारे अनुदान देण्याचे होते व अशाच प्रकारचे अनुदान शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
शासनाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन पिकासाठी अशा प्रकारचा एकूण निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, शेतकऱ्यांना प्रति एकरी पाच हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान दिले जाईल व हे अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये असणार आहे, शेतकऱ्यांना असे पीकानुसार अनुदान मिळू शकेल. व त्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही.
ना हरकत प्रमाणपत्र पत्र व संमती पत्र या ठिकाणी
शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता कृषी विभागांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र व संमती पत्र जमा करायचे आहे, संमतीपत्र व नाहरकत पत्र वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे, याची शेतकऱ्यांनी प्रिंट काढावी त्यानंतर त्यामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी व कृषी विभागांमध्ये हे दोन प्रमाणपत्र जमा करावे.