सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन काढणी करून बाजारांमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे, तर विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो आहे, तसेच सोयाबीनचे दर कसे राहतील व अभ्यासकांच्या मध्ये सोयाबीन दराबाबत काय मत आहे हे जाणून घेऊया तसेच सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ झालेली असल्याची बातमी असून सोयाबीनचे दर थोड्या प्रमाणात वाढलेले असते. सोयाबीनच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात चढ झालेली असून शेतकऱ्यांना याचा अर्थातच फायदा होईल.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील सोयाबीन पिकाची काढणी केलेली आहे व, शेतकरी बाजारात सोयाबीनच्या विक्रीसाठी सोयाबीन आणत आहेत परंतु बाजारात मिळणारा दर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याने शेतकरी मात्र नाराज आहे कारण मागील वर्षीपासून अजूनही सोयाबीनचे दर खूप कमी असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण होऊन बसलेले आहे व सध्याच्या स्थितीत थोड्या प्रमाणात सोयाबिन दरात बदल बघायला मिळत आहे, त्यामुळे सोयाबीनला विविध बाजार समितीमध्ये काय दर मिळाला हे शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे.
हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला जर 4 हजार 400 रुपये एवढा होता, 4150 रुपये एवढा सरासरी दर त्या ठिकाणी सोयाबीनला मिळालेला आहे. यवतमाळ येथील महागाव बाजार समितीमध्ये 4500 एवढा दर मिळालेला असून, सरासरी दर चार हजार दोनशे रुपये एवढा बघायला मिळाला. जालना जिल्ह्यातील परतुर बाजार समितीत चार हजार चारशे रुपये एवढा दर सोयाबीनला मिळाला तर सरासरी दर चार हजार तीनशे रुपये एवढा होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये एवढा दर सोयाबीनला प्रतिक्विंटल प्रमाणे मिळाला तर सरासरी दर 4200 एवढा बघायला मिळाला. हिंगोली बाजार समिती 4400 ते सरासरी चार हजार दोनशे रुपये असा दर होता. अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये वरील दिलेल्या दरानुसार प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीनला दर मिळवताना दिसतो आहे. तसेच अभ्यासांच्या मध्ये पुढील काही काळामध्ये सोयाबीनच्या दरात अशाच प्रकारची चढउताराची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना दिवाळीला कांदा रडवणार, कांद्याच्या दरात अजूनही वाढ होणार