सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनचे पीक काही भागात काढणीच्या स्थितीमध्ये आलेले आहे, परंतु मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनच्या पिकाला पाण्याचा फडका बसला परंतु आता पिकाची काढणी झाल्यावर बाजारात सोयाबीनला नेमका दर मिळणार किती? हा मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित झालेला आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीन किती रुपये दराने विकावी लागणार, याची चिंता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लागलेली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती, शासनाने आयात शुल्कात वाढ करावी शासनाच्या माध्यमातून सोयाबीन आयात शुल्कात वाढ करण्यात आलेली असून पूर्वी असलेला सोयाबीनचा निर्यात शुल्क 40 टक्के होता व त्यामध्ये घट करून आता 20 टक्के एवढा करण्यात आलेला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मागील वर्षी तोटा सहन करावा लागला कारण कांद्यावर निर्यात बंदी लावलेली होती निर्यात किमतीचे निर्बंध लावलेले होते व हे निर्बंध काढून टाकावे अशी मागणी होत असल्याने केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात किमतीचे बंधन काढून टाकलेले आहे. अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होणार का? जर झाला तर शेतकऱ्यांना किती रुपये दर मिळणार? सोयाबीनला चांगला दर मिळावा अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.