मागील वर्षी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगाने अटॅक केलेला होता, त्यामध्ये येलो मोझॅक हा रोग अत्यंत भयंकर होता येल्लो मोझॅकने मोठ्या प्रमाणात क्षेत्र गाठलेले होते त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मागील वर्षी अतोनात नुकसान झालेले होते, अगदी कळी अवस्थेमध्ये पीक असताना व शेंगा धरताना हा रोग आल्याने शेंगा खूपच बारीक राहिल्या त्यांची वाढ झाली नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला यातच सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्याने हा दुसराही तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला, परंतु यावर्षी सोयाबीनवर येलो मोझॅक अटॅक येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजी राखणे आवश्यक आहे.
सोयाबीन वर येत असलेल्या येलो मोझॅक चा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्यंत सहजरित्या व काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना योग्य कंपनीची चांगले वान खरेदी करावे कारण काही वानांवर येलो मोझॅकचा अटॅक लवकर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्याची पडताळणी करून आणावे, पेरणी केल्यानंतर जेव्हा पीक उगवते त्यानंतर शेतकऱ्यांनी पिकावर लक्ष देऊन कोणकोणत्या प्रकारची कीटक आहे? याचे निरीक्षण करून फवारण्या कराव्या.
जेव्हा मावा पांढरी माशी सोयाबीन वर दिसेल अशावेळी लवकरात लवकर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे कीटकनाशकांची फवारणी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पिकावर करावी, प्रति एकर 10 चिकट सापडे लावा, सोयाबिन कमीत कमी पहिले 45 दिवस तण मुक्त ठेवणे आवश्यक आहे, शेतात पावसाचा खंड पडलेला असेल तर अशा वेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी द्यावे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये, अनुदानात तुम्ही पात्र आहात का?