ज्या घरात मुलींचा जन्म झालेला आहे व मुलींच्या भविष्याची काळजी प्रत्येक आई-वडिलांना लागलेली असते त्यामुळे कशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आई-वडिलांना आपल्या मुलीच्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याची गरज नाही कारण शासनाच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून मुलींसाठीची एक योजना राबवली जात आहे व ती योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना होय या योजनेअंतर्गत मुलीच्या नावे गुंतवणूक करता येते व या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व्याजदर हा या योजनेच्या माध्यमातून दिला जातो त्यामुळे मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत तब्बल 70 लाख रुपयांची मालकीण ही एक मुलगी होऊ शकते.
अनेक मुलींच्या वडिलांना या सुकन्या समृद्धी योजना बद्दल माहिती नाही त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे कारण या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात मुलींना चांगला व्याजदर दिला जातो व मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेचच सुद्धा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने गुंतवणूक करता येऊ शकते मुलीचे वय दहा वर्षे होईपर्यंत या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे, म्हणजेच ज्या मुलींचे वय दहा वर्षाच्या आत आहे अशा मुली योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 250 रुपये पासून दीड लाख रुपये पर्यंतचे गुंतवणूक करता येते. 8.2 एवढे व्याजदर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर दिले जाते. उदाहरण घ्यायचे झाल्यास जर दर वर्षाला दीड लाख रुपये गुंतवले असेल तर पंधरा वर्षांमध्ये होणारी गुंतवनुक 22,50,000 रुपये एवढी होईल, व 21 वर्षाच्या मुदतपूर्तीच्या वेळेपर्यंत 46,77,578 रुपये एवढा व्याज मिळेल. व्याज व गुंतवलेली रक्कम असे एकूण मिळून 69,27,578 रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावे 21 वर्षापर्यंत जमा होईल अर्थातच 70 लाख रुपयांची मालकीण 21 वर्षापर्यंत एक मुलगी होऊ शकणार आहे. अशाप्रकारे मुलींच्या नावे प्रत्येक वडिलांनी सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून लाभ घेणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.