देशामध्ये केंद्राच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते, या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो नागरिक आपल्या मुलीच्या नावे खाते काढून त्यामध्ये पैशाची गुंतवणूक करून तिच्या लग्नासाठी व शिक्षणासाठीची गुंतवणूक करत आहेत, सुकन्या समृद्धी योजना ही एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी मुलीला अगदी कमी गुंतवणुकीवर सुद्धा 8.2% एवढे मोठ्या प्रमाणात व्याज दिले जाते ही योजना मुलीचे वय दहा वर्ष होण्याच्या आधी मुलगी लाभ घेऊ शकते. व आता सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचे ठरवण्यात आलेले असून, पोस्ट खात्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे व नवीन नियमानुसार अंमलबजावणी करावी असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे.
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलगी खाते काढून त्या खात्यामध्ये कमीत कमी 250 ते 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक रक्कम गुंतवू शकते त्यामुळे या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात जमा केल्यास रक्कम जमा होते, व शेवटी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर पन्नास टक्के एवढे रक्कम सुद्धा मुलीला योजनेअंतर्गत गुंतवलेली काढता येऊ शकते, तसेच आतापर्यंत अनेक नागरिकांनी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ओपन केलेले आहे परंतु त्यातीलच अनेकांनी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दोन खाते ओपन केलेले आहे ज्यांचे दोन खाते असेल अशांना आता एखादी मुलीच्या नावावर ठेवून दुसरे असलेले खाते वडिलांच्या नावावर करावी लागेल अन्यथा हा गैरप्रकार म्हणून सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद पडले जाईल.
आता वडीलाचे आधार कार्ड, पॅन कार्ड खाते काढताना जोडावे लागेल तसेच त्यांनी पूर्वीचे खाते ओपन केलेले आहे अशांना सुद्धा पॅन कार्ड व आधार कार्ड वडिलांचे जोडलेले नसेल तर ते जोडून घ्यावे लागणार आहे. मुलीच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याला व आई-वडिलांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे, अशा प्रकारचा हा नवीन नियमातील बदल केलेला असून ज्यांनी सुकन्या योजनेची दोन खाते काढलेले असतील त्यातील एक वडिलांच्या नावावर करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दोन खाते वैद्य ठरवले जाणार नाही, अशा प्रकारची सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.