देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी या बातमीने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे, कारण आताच्या आलेल्या बातमीनुसार शासनाने आयात शुल्क वाढवलेले असून दहा टक्क्यांनी वाढवलेले आहे व त्यामुळेच याची घोषणा होताच देशातील विविध भागांमध्ये तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळलेले आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारच्या तेलाला किती रुपये दर मिळतोय किती प्रमाणात वाढ झालेली आहे, अशा प्रकारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
आयात शुल्क दहा टक्क्यांनी वाढल्याची बातमी पसरल्याबरोबर विविध भागांमध्ये एखाद्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते आयात शुल्क वाढल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना जास्त पैसे तेलासाठी मोजावे लागणार आहे, त्यामुळे साधारणतः 20 ते 25 रुपये प्रमाणे किमती वाढल्याचे चित्र आहे, त्यामुळे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल तसेच शेंगदाणा तेल या तेलाचे दर वाढीव दरानुसार किती रुपये आहेत व पूर्वीचे दर किती रुपये आहेत हे सर्व सामान्य नागरिकांनी जाणून घेणे आवश्यक आहे.
सूर्यफूल तेलाला 130 रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळत आहे व हाच दर पूर्वी 115 रुपये किलो एवढा होता. 185 रुपये प्रति किलो असा तर शेंगदाण्याला मिळत आहे व हाच दर पूर्वी 175 रुपये किलो होता, म्हणजेच शेंगदाणा तेलाच्या दरात दहा रुपयांची वाढ झालेली असून, सूर्यफूल ते20 ते 25 रुपये प्रमाणे किमती वाढल्याचे चित्रलाच्या दरात 15 रुपयांची वाढ झालेली आहे. पूर्वी सोयाबीनचे तेल 110 रुपये प्रती किलो मिळत होते परंतु वाढलेल्या दरानुसार 130 रुपये प्रति किलो हा दर मिळतोय.
अशाप्रकारे सध्याच्या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे व याचाच फटका सर्वसामान्य गरीब कुटुंबांना बसणार आहे. व खाद्य तेलाच्या खरेदी दरम्यान ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. वरील दिलेल्या दरानुसार आता खाद्य तेल उपलब्ध होईल.