सध्याच्या स्थितीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टोकन यंत्रासाठी 50% एवढी सबसिडी दिली जाणार आहे, ज्या शेतकऱ्यांना टोकन यंत्र खरेदी करायची असेल अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मरच्या पोर्टल वर जाऊन लगेचच टोकन यंत्र अनुदानासाठी चा अर्ज पूर्ण करावा टोकन यंत्राची मदत शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होते कारण मजुराच्या अनुउपलब्धतेमुळे टोकन यंत्र हे एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करते.
शेती करत असताना शेतकऱ्याला कोणत्याही बियाण्याच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या हवी असते परंतु मजुरांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही, अशा स्थितीमध्ये अनेक कामे खोळंबत ठेवावी लागतात, परंतु पेरणीच्या कामाच्या वेळी शेतकऱ्याला टोकन यंत्र अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे टोकन यंत्राच्या खरेदीसाठी 50 टक्के एवढे अनुदान दिले जाईल हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी या संबंधित अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे चालू झालेले आहे.
महाडीबीटीच्या माध्यमातून मोठ्या प्रकारे विविध योजनांसाठी अर्ज केले जाऊ शकते त्यामध्ये सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login पोर्टल ओपन करून लॉगिन करून शेतकऱ्याला टोकन यंत्राची ऑप्शन निवडून 23 रुपये त्या ठिकाणी भरावे लागतील त्यानंतर सर्व प्रकारचा अर्ज भरून टोकन यंत्र अनुदान निवडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अर्ज सबमिट करावा, त्यानंतर काही दिवसांनी पात्र लाभार्थ्यांची यादी काढली जाईल व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 टक्के अनुदानाची रक्कम जमा केली जाईल अशा प्रकारे जर शेतकऱ्याला टोकन यंत्रासाठीचे 50 टक्के अनुदान हवे असेल तर शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मरच्या पोर्टल वर जाऊन लगेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
ड्रोन अनुदानासाठी अर्ज सुरू महाडीबीटी फार्मर पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार अर्ज