महिला स्वावलंबी व्हाव्या त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा याकरिता शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या महिलांसाठी योजना राबवल्या जातात, त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची योजना ही महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे, ती योजना म्हणजेच उद्योगिनी योजना होय, या योजनेअंतर्गत महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी स्वतःचा बिजनेस चालू करण्यासाठी उद्योगिनी योजनेअंतर्गत तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व हे कर्ज बिनव्याजी असणार आहे त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून कोणत्या महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे 30 टक्के अनुदान सुद्धा यासोबत मिळणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
उद्योगिनी योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच लाभ घेता येणार आहे, महिलांच्या नावे कोणत्याही प्रकारचे कर्ज डिपार्टर म्हणून नसावे, योजनेअंतर्गत 18 ते 55 या वयोगटातील महिलांना लाभ घेता येणार आहे तसेच, निराधार अत्यंत गरीब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विधवा, शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या महिला यांना एक प्रकारे उद्योगिनी योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे, व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे व्याज त्या महिलांना भरावे लागणार नाही व कर्जाची उपलब्धता सुद्धा योग्य प्रकारे होईल.
तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज उद्योगिनी योजनेअंतर्गत व्यवसाय चालू करण्यासाठी महिलांना दिले जाणार आहे, सौंदर्यप्रसाधने,दुकान, साडी, अगरबत्ती उत्पादन, पिठाची गिरणी, स्टेशनरी स्टोअर, बेकरी, रास्त भाव दुकान अशा प्रकारचे व्यवसायात चालू करणाऱ्यास किंवा चालू करू इच्छिणाऱ्या महिलांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. बजाज फायनान्स सारख्या खाजगी वित्तीय संस्था देखील उद्योगिनी योजनेअंतर्गत कर्ज देतात तसेच लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागेल, त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशा प्रकारची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागेल. त्यानंतर महिलांना कर्ज उपलब्ध होणार आहे.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजना, लगेच अर्ज करा