राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यातीलच एक शासनाने राबवलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील वयोवृद्ध असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना वार्षिक तीन हजार रुपयांची रक्कम एक रकमी दिली जाणार आहे यामुळे जेष्ठ नागरिक यांना होणारा विविध प्रकारचा त्रास त्यामुळे विविध प्रकारच्या उपकरणाच्या सुविधा सुद्धा त्यांना या तीन हजाराच्या रकमेमुळे उपलब्ध होऊ शकतात.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लाभ घेता येतो त्यामध्ये वार्षिक तीन हजार रुपयांची रक्कम दिली जाते, व त्यांचे दैनंदिन आयुष्य अशा प्रकारे योग्यरीत्या चालू राहावे, वय वाढत चालल्याने येणारे अपंगत्व व त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध होणार याकरिता ही योजना उद्दिष्ट पुढे ठेवून अंमलबजावणीत आणली गेलेली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये DBT च्या माध्यमातून आधार लिंक खात्यामध्ये पैसे वितरण केले जाईल.
https://drive.google.com/file/d/1DbszuyJ682sgpQ5to1WRMtF5l-9pNSl1/view?usp=drivesdk
अर्ज प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी पूर्ण करावी लागणार आहे, व हा अर्ज वरील प्रमाणे देण्यात आलेला असून त्याची प्रिंट काढून, दिलेली संपूर्ण माहिती भरून जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या समाज कल्याण विभागामध्ये अर्ज जमा करावा. अर्जा सोबत काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा जोडावे लागणार आहे, त्यात आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, घोषणापत्र अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे त्याच्यासोबत जोडावी लागणार आहे.
राज्यातील नागरीकांना मोफत वीज, वीज बिल भरण्याचे टेन्शन नाही, शासान माहिती