बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर अनुदानामध्ये वाढ, जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळणार एवढे अनुदान | Vihir Anudan 

शासनाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून शेतकरी सर्वसामान्य नागरिक महिला विद्यार्थी वर्ग अशा सर्वांसाठी विविध प्रकारचे निर्णय घेतले जात आहे, व त्यातीलच एक निर्णय शेतकऱ्यांसाठीचा घेतलेला असून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीसाठी मिळणारे अनुदान वाढवण्यात आलेले असून, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी जे अनुदान पूर्वी दिले जात होते, त्यात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय घेण्यात आल्याने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मिळणारे विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांना वाढीव पद्धतीने मिळणार आहे. 

 

शासनाने घेतलेल्या विहीर अनुदानाच्या वाढीसाठीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा झालेला असून वाढीव अनुदानामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत मिळवून त्यांना पुर्वी विहीर खोदताना कोणत्याही प्रकारची पैशाची टंचाई पडणार नाही व त्यामुळे शेतीला पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होऊन सिंचनाची सुविधा सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे, त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ सुद्धा होऊन शेतकरी प्रगत दिशेने वाटचाल करू शकतो, अशा प्रकारचे उद्देश शासनाने पुढे ठेवून अनुदानात वाढ केलेली आहे.

 

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये एवढे अनुदान दिले जात होते, परंतु आता शासनाने दिलेल्या माहितीनुसार अनुदानात वाढ करून आता नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे, त्याच पद्धतीने जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये एवढे अनुदान दिले जात होते, यात वाढ करून एक लाख रुपये एवढे अनुदान जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत दिले जाईल.

 

पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे काम पूर्ण करावे लागणार 

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts