राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये विहिरीच्या विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यामध्ये शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते त्यासह वीहीर दुरुस्तीसाठी सुद्धा एक प्रकारे अनुदान शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातून पुरवले जाते शेती करत असताना एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजेच शेतीला पाणीचा पुरवठा शेतीमध्ये पाण्याचा पुरवठा असेल तर मोठ्या प्रमाणात शेतीतून उत्पादन काढल्या जाऊ शकते परंतु शेतीमध्ये पाणी उपलब्ध नसेल तर शेतकऱ्याला चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात उत्पन्नात समाधानी राहावे लागते त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांना आता विहिरीच्या साठी चार लाख रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.
राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विविध प्रकारचे विहिरीसाठी अनुदान दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये एवढे अनुदान तर विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये एवढे अनुदान दिले जाते. तसेच विद्युत पंप संच, वीज जोडणी, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यासाठी विविध प्रकारचे लाभ दिले जातात या विविध प्रकारच्या योजनांसाठी अनुदान विविध रकमेमध्ये दिले जाते.
शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी http://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login ओपन करून या ठिकाणी विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, व शेतकऱ्यांची यामध्ये पात्र असल्यास निवड होईल व त्यानंतर शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातील, त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या इतरही योजनांचा लाभ घेण्यासाठी याच पोर्टलवरून शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे व ही अत्यंत सोपी प्रक्रिया शेती पिकाला एक प्रकारे सिंचनाची सुविधा प्राप्त होऊ शकेल.
1 नोव्हेंबर पासून या नागरिकांचे रेशन धान्य होणार बंद, लगेच सावध व्हा व ही प्रक्रिया पूर्ण करा