मागील वर्षी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा शतीमध्ये कापूस या सोयाबिन या पिकासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, व त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस या पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये कापूस व सोयाबीन साठीचे अनुदान दिले जाईल यासंबंधी सूचना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे.
शासनाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येक गावामध्ये पाठवण्यात आलेली आहे, व त्यामुळे अशा यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील अशा शेतकऱ्यांनी संमती पत्र घेऊन त्यामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून व जर सामायिक क्षेत्र असेल तर ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्यावर सुद्धा योग्य प्रकारे माहिती भरून त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडून शेतकऱ्यांना कृषी विभागांमध्ये ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली नसतील अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांची ई पीक पाहणी केलेली होती, परंतु काही शेतकऱ्यांची नावे आलेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांची नावे फक्त कापसाच्या यादीत आहे तर काही शेतकऱ्यांचे नाव फक्त सोयाबीनच्या यादीत आहे, अशी अडचण असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तलाठ्याशी संपर्क साधून आपले नाव यादीत नसल्याची माहिती द्यावी व त्यानुसार त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी पुढील प्रोसेस करावी.
शेतकऱ्यांनी ज्या पिकासाठी ई पीक पाहणी केलेली होती परंतु त्या पिकाच्या यादीत शेतकऱ्यांचे नाव नसेल तर तलाठ्याशी संपर्क साधून यादीत नाव प्रविष्ट करण्यास सांगावे व त्यानुसार पुढील प्रकारची प्रोसेस शेतकऱ्यांना करून अनुदानाचा लाभ घेता येणार आहे, अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून येत्या काही दिवसातच कापूस सोयाबीनचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाणार आहे.